पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर !

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर !

कोलकाता – देशभरात भाजपच्या विरोधात नाराजी वाढत आहे. त्याचा फायदा घेत देशभरातील विरोधकांना एकत्र करुन सत्ताबदलाची स्वप्न पाहणा-या काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये मात्र स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे राज्यात पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे कुठल्यातरी पक्षासोबत आघाडी करुनच आगामी लोकसभा निवडणूक लढवावी अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ते आघाडीसाठी आग्रह धरत आहेत. पण हाच मुद्दा काँग्रेस अडचणीचा ठरत आहे. कारण आघाडी कोणासोबत करायची यावरून पक्षात दोन गट पडले आहेत.

पक्षाचा एक गट पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमुल काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आग्रह धरत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आघाडीसाठी तृणमुलसोबत बोलावे अशी त्यांची मागणी आहे. तृणमुलसोबत लढलं तरच पक्षाचा आगामी लोकसभा निवडणुकीत टिकाव लागेल असंही त्या गटाला वाटतंय. राज्यात सध्या 2019 सारखी स्थिती नाही. राज्यात भाजपची ताकद वाढत आहे. जर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेस राज्यात वेगळे लढले तर दोघांनाही त्याचा फटका बसले आणि त्याचा भाजपला फायदा होईल. हे टाळण्यासाठी पक्षाने तातडीने तृणमुल काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू  कराव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. एवढच नाही तर तृणमुलसोबत आघाडी केली नाही. तर पक्ष सोडण्याची धमकीच त्यांनी पक्षाच्या हायकमांडला दिली आहे.

दुसरा गट मात्र तृणमुल काँग्रेसोबत आघाडी करायच्या तीव्र विरोधात आहे. त्यांना डाव्या पक्षासोबत आघाडी करावी असं वाटतंय. तृणमुलनं पश्चिम बंगालमधील काँग्रेस संपवण्याचा विडा उचलला आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये तृणमुल काँग्रेसनं लोकशाहीची हत्या केली. गुंडगिरी करुन मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली असाही या गटाचा आरोप आहे. तृणुलसोब आघाडी करुन काहीप्रमाणात तात्काळ फायदा होईल. मात्र दूरगामी विचार करता डाव्या पक्षांसोबत आघाडी केली तर पक्षाला आगामी काळात त्याचा फायदा होईल असंही एका गटाला वाटतंय. तृणमुलसोबत आघाडी केली तर आपण त्यासोबत नसू असा इशारा दुस-या गटानं दिला आहे. स्वबळावर लढण्याची पक्षाची ताकद नाही. तर दुसरीकडे कोणासोबतही आघाडी केली तर एक गट बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रस फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

COMMENTS