मुंबई महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अंदाजित खर्च 12 हजार कोटी आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूदही करण्यात आली. त्याचसोबत मुंबईतला पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दिवसेंदिवस मुंबईकरांना पार्किंगचा प्रश्न सतावत असल्यानं वाहनतळांची संख्या तीन पट वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पातून बेस्टच्या पदरी निराशा पडली आहे. अर्थसंकल्पात बेस्टच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद केली असून, यासाठी १२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
वाहनतळांची संख्या 92 वरुन ही संख्या 275 करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे, तसंच तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी 1 कोटींची तरतूद केली आहे. दुसरीकडे रस्ते कामांमध्ये यंदा बरीच काटकसर करण्यात आली आहे. रस्ते पुनर्बांधणीसाठी 1095 कोटींची तरतूद केली असून, मागील वर्षी 2886 कोटी एवढी तरतूद करण्यात आली होती. तर यंदा नालेसफाईसाठी 74 कोटींची तरतूद केली आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
शिक्षण समितीसाठी यंदा 2311.66 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या शिक्षण समिती अर्थसंकल्पात 83 कोटींची घट झाली आहे.
#२०१७-१८ चे महापालिका बजेट स्था़ी समितीत सादर
# आयुक्त अजोय मेहतांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकरांना केले सादर
# २५ हजार १४१ कोटी रूपयांचे बजेट सादर
# मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १२ हजार कोटी रूपयांनी कमी बजेट सादर
# मागील वर्षी ३७ हजार कोटी रूपयांचे बजेट होते
# कोस्टल रोडसाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद
# तोट्यात असलेल्या बेस्टसाठी बजेटमध्ये तरतूद नाही
# गोरेगाव – मुलूंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद
# रस्त्यांसाठी फक्त १०९५ कोटी रूपयांची तरतूद…मागील वर्षी २८८६ कोटींची तरतूद होती
# रस्त्यांसाठीची तरतूद १८०० कोटींनी घटवली
# वाहनतळांची संख्या ९२ वरून २७५ पर्यंत करणार
गझदरबंध व माहूल पंपिंग स्टेशनसाठी ६५ कोटींची तरतूद
– कँशलेसला उत्तेजन दिले जाणार, ११५ महापालिका सेवा एम-गव्हर्नस अंतर्गत मोबाईलवर उपलब्ध करून देणार
– शिक्षण विभागाच़्या सेवाही ऑनलाईन देणार
– नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद
– पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ४७५ कोटी
– उघड्या नाल्यांचे प्रायोगिक तत्वावर एफआरपी व अँक्रेलिक पत्र्याने आच्छादीकरण करणार. कचरा टाकण्यावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न, दुर्गंधी कमी करणे, डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट.
यासाठी ९ कोटींची तरतूद. मुलूंड व कांदीवली येथील नाले झाकले जाणार
पालिका रूग्णालयातील व्हेंटिलेटर्स संख्या ४०० पर्यंत वाढविण्यासाठी ३० कोटींची तरतूद
– संसर्ग रोखण्यासाठी ९ नविन मॉड्यूलर ऑपरेशन थियटरसाठी २१.५० कोटी
– टीबी नियंत्रणासाठी ९० कोटी
– ‘आपली चिकीत्सा’ केंद्र सुरू करणार. पालिका दवाखान्यातून नि:शुल्क निदान सेवा उपलब्ध करून देणार.यासाठी १६ कोटींची तरतूद
– गोरेगाव इथं मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. १० लाखांची तरतूद
-हागणदारीमुक्त मुंबईसाठी. सामुदायिक शौचालय- ७६ कोटी, घरगुती शौचालय- ६.७० कोटी, महिलांसाठी ८ नवी शौचालये -२.८८ कोटींची तरतूद
राईट टू पीसाठी भरीव तरतूद नाही
-रस्त्यांवरील साफ सफाईसाठी यांत्रिक झाडू २० कोटींची तरतूद
– झोपडपट्ट्यांमधील सामूहिक शौचालयात १०० सँनिटरी नँपकीन व्हेंडींग मशीन बसवणार . १ कोटी तरतूद
– डंपिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी १५० कोटींची तरतूद
– ८४ मैदानांचा विकास केला जाणार, यासाठी २६.८० कोटींची तरतूद
– २० उद्याने, मनोरंजन मैदान विकासासाठी ७० कोटी
– ८ जलतरण तलावांसाठी ४५ कोटी. कांदीवली इथं ऑलंपिक दर्जाचा स्विमिंग पूल उभारणार
– वांद्रे किल्ला विकासासाठी १ कोटींची तरतूद
– उद्यान खात्याकरत २९१ कोटींची तरतूद
– राणीबागेसाठी ५० कोटी
– अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी १६४ कोटी
– बाजार,मंडई खात्याकरता ७५ कोटी
– समुद्र किनारे सुशोभीकरणासाठी १५ कोटी
– आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ११.७५
– २०० नोकरदार महिलांची राहण्याची व्यवस्था असणारे वर्किंग वुमेन हॉस्टेल बांधणार , १ कोटी तरतूद
– दिव्यांग व्यक्तींना साईडकारसह स्कूटरसाठी ६ कोटींची तरतूद
– काळा चौकी इथं रिक्रिएशन ग्राऊंड कम टेक्सटाईल म्युझियम बांधणे २.५० कोटी तरतूद
– भारताचे स्वातंत्र्य संग्रहालयसाठी १ कोटी
– मुंबई जल वितरण सुधारणा कार्यक्रमासाठी २७.८१ कोटी तरतूद
– चेंबूर ते परेल जलबोगद्यासाठी ३५ तर चेंबूर ते टृॉम्बे जलबोगद्यासाठी २५ कोटींची तरतूद
– भांडूप संकूल सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ८.२२ कोटींची तरतूद
– मलनि:सारण प्रकल्पांसाठी ४४४ कोटींची तरतूद
– पालिकेच्या बजेटमध्ये ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील तरतूद नाही
– शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचननाम्यात मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात दिले होते वचन
– तसंच ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणाही हवेतच
COMMENTS