दूध आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीयांसोबत बैठक, अंतिम तोडगा गुरुवारी ?

दूध आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीयांसोबत बैठक, अंतिम तोडगा गुरुवारी ?

नागपूर – दोन दिवसांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीयांसोबत बैठक घेतली. दूध दराच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. पंरतु या बैठकीत अजून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं दिसत आहे. तसेच गुरुवारी खासगी दूध संघ प्रतिनिधी, सहकारी दूध संघ प्रतिनिधी यांच्याबरोबर नागपूर विधीमंडळमध्ये बैठक घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गुरुवारी होणा-या या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यानन आज घेण्यात आलेल्या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, एकनाथ शिंदे, संजय दत्त, विनायक मेटे उपस्थित होते.

COMMENTS