छगन भुजबळ यांना पीएसआयची दारू पिऊन शिविगाळ, विधानसभेत प्रचंड गदारोळ !

छगन भुजबळ यांना पीएसआयची दारू पिऊन शिविगाळ, विधानसभेत प्रचंड गदारोळ !

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांना एका पिएसआयनं शिविगाळ केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकऱणी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला असून श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शिविगाळी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महावीर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग मांडला असून महाराष्ट्रातल्या आमदारांची खिल्ली उडवली जाते. अहमदनगर येथील भीमराव नलगे यांच्या घरात घुसून महिलांना अश्लील शिवीगाळ केली जाते. भुजबळ साहेबांचा संबंध नसताना पोलीस अधिकार्‍यांनी तिथे जाऊन शिवीगाळ केली याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महाविर जाधव याचं निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान अशा अधिकाऱ्यांना कडक मेसेज पाठवला पाहिजे, अधिकारी मुजोर झाले आहेत एकाही आमदाराला विचारत नसल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला आहे. सभागृहाची भूमिका सत्ताधारी की विरोधक हा प्रश्न नाही, दिवसेंदिवस हे प्रकार वाढत असून सरकारी अधिकाऱ्यांकडून जी वागणूक मिळते ती चुकीचं असल्याचंही यावेळी विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच प्रत्येक घटनेच्या वेळी सभागृह आमदारांच्या मागे उभं राहतं. जे अधिकारी मुजोर झाले पाहिजे अशा लोकांना शासन करण्याची गरज असल्याचंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्या सदस्याचा संबंध नसतात एखादा अधिकारी दारू पिऊन शिविगाळ करतो, ही कसली मुजोरी आहे असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. आम्ही अधिकार्‍यांविरोधात नाही, मात्र अशा मुजोर अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. भुजबळांचा संबंध नसताना शिविगाळ केली, त्या अधिकार्‍यांला निलंबित करा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान यावेळ सुनील प्रभू यांनी देखील भुजबळांची बाजू घेतली असून अधिकारी भुजबळांना शिविगाळ करतात एवढेच नाही तर महिलांवर हात टाकतात ही कसली मुजोरी असल्याचा सवाल प्रभू यांनी केला आहे. तसेच  पोलीस अधिकारी सगळ्यांचा अपमान करतात भुजबळांचा अवमान करणार्‍या अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 भुजबळांची प्रतिक्रिया

मला स्वतःला याबाबत हक्कभंग मांडणे योग्य वाटत नव्हते. मी काय सांगू की मला आई बहिणीवरून शिविगाळ केली. मी त्या गावाला गेलो नाही, त्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही, पोलीस उपनिरीक्षकाशी काहीही संबंध नाही. आणि तो आई बहिणीवरून शिविगाळ करतो. किती वाचून दाखवू अशी खंत यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली.

COMMENTS