काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, नक्षलवाद्यांची निवडणुकीसाठी ऑफऱ !

काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, नक्षलवाद्यांची निवडणुकीसाठी ऑफऱ !

नवी दिल्ली – काँग्रेस नेत्यानं पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला असून नक्षलद्यांनी निवडणुकीत मदत करण्याची ऑफर दिली असल्याचं छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांनी म्हटलं आहे. नक्षलवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असून मला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख माओवादी नेता अशी करुन दिली होती. त्याने स्वतःचे नाव गणपथी असे सांगितले असून आम्ही आगामी निवडणुकीत काँग्रेसलाच पाठिंबा देऊ असं म्हटलं असल्याचं बाघेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ३७ जागांवर आमचा प्रभाव आहे असून याठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करु असं या नक्षलवाद्यानं म्हटलं असल्याचं बाघेर यांनी म्हटलं आहे. तसेच ‘मला या प्रकारावर संशय आला. माओवादी नेता गणपथीच्या नावाने हा फेक कॉल असावा असं मला वाटले. मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्नही केला. यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की, गणपथी नावाने तुम्हाला कधी फोन आला आहे का?, माझ्या नावाने कोणी दुसऱ्याने फोन केला तर त्याचा शिरच्छेद केला जाईल. तसेच पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्षात भेटून निवडणुकीबाबत चर्चा करु असंही गणपथीने सांगितल्याचा दावा बाघेर यांनी केला आहे. याबाबत पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली असून मला ज्या क्रमांकावरुन फोन आला तो क्रमांकही मी पोलिसांना दिला असल्याचं बाघेल यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS