जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं होमपिच असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पहिल्यांदाच नगरपंचायतीचं मतदान झालं. त्याची मतमोजणी आज सुरू होत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गड राखतात की विरोधकांचा शिरकाव तिथे होतो ते पहावं लागेल. थेट जनतेतून निवडूण दिल्या जाणा-या नगराध्यक्षपदासह सर्वच १८ जागांचा उद्या दुपारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदांसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होत आहे.
विधीमंडळाचं अधिवेशन सोडून एकनाथ खडसे प्रचारामध्ये बिझी होते. अधिवेशन सोडून खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये तळ ठोकला होता. सकाळी नऊ वाजता मुक्ताईनगर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. १५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत ६५.४६% झालं होतं. मुक्ताईनगर नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. एकनाथ खडसे आपला गड राखतात की विरोधक घुसखोरी करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
COMMENTS