मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपबरोबर असेल की नाही याचं उत्तर तुम्हाला 23 तारखेला मिळणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची ‘सामना’त स्पष्ट आणि परखड मतं व्यक्त करणारी मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आता एनडीएच कागदावर आहे. अटलजींच्या काळात बहुमत असूनही मित्र पक्षाना विचारलं जात होतं. त्यावेळी एनडीएचं महत्व होतं पंरतु आता एनडीएला महत्त्व राहिलं नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच 2019 ला भाजपला बहुमत मिळालं नाही तेव्हा मग घटकपक्ष आहेत त्यांची एनडीए बनेल ती खरी एनडीए असेल ती कागदावर नसेल असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हे काँग्रेसच्या बाबतीतही असून त्यांना बहुमत मिळालं तर त्यांना युपीएचं महत्त्व कळणार नाही. देशातलं वातावरणात 2014 आणि 2019 मध्ये फरक असल्याचंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी पवारांना गोंजारलं ते चालत पण राहुल गांधी यांनी एक मिठी मारली तर एवढी टीका का ? केली जाते असा सवालही राऊत यांनी केला आहे. तसेच वैचारिक मतभेद असू शकतात पण राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसशी पण राजकारणात एखादी व्यक्ती चांगले काम करते मग ती विरोधक जरी असली तरी तिचं ‘अप्रिसीएशन’ करावं लागतं.
आमचे राहुल गांधींवर राजकीय प्रेम नाहीये, ते एका घटनेपुरतं आहे. त्यांनी काल सभागृहात उत्तम भूमिका मांडली. काल संसदेत झालेली दोन भाषणं आणि शिवसेनेची कृती या दोन गोष्टी देशभर चर्चेत होत्या.राहुल गांधी बोलले म्हणून लोक त्यांची पाठ थोपटत आहेत, शिवसेना न बोलता लोक शिवसेनेची पाठ थोपटत असल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS