पिंपरी-चिंचवड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एका महिलेनं घोषणाबाजी केली असल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान या महिलेनं घोषणाबाजी केली असून त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच ही महिला कोण आहे आणि कशासाठी कार्यक्रमादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर होते. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्यावेळी 25 ते 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पिंपरीतील क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीतचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं करण्यात आली आहे.
COMMENTS