केरळसाठी काँग्रेसचे आमदार, खासदार देणार एका महिन्याचा पगार !

केरळसाठी काँग्रेसचे आमदार, खासदार देणार एका महिन्याचा पगार !

मुंबई – केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत तर काहींचा जीवही या महापुरात गेला आहे. केरळसाठी देशभरातून मतदीचा हात दिला जात असून काँग्रेसच्या सर्व आमदार आणि खासदारांनी एका महिन्याचा पगार केरळसाठी देण्याचं ठरवलं आहे. याबाबतची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.याबाबत देशातील सर्व काँग्रेसचे आमदार आणि खासदारांना एका महिन्याचा पगार पक्षाकडे जमा करण्याचे आदेशही राहुल गांधी यांनी दिले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केरळसाठी मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS