मुंबई – भाजपाला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे.या राज्यात फटका बसला तर त्याचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीवर होईल अशी भीती भाजपाला वाटते. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपाचा पराभव होणार आहे. त्या भीतीमुळेच भाजपाकडून लोकसभेची निवडणूक या राज्यांबरोबर घेण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंता पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान राज्य सरकार गो सेवकांना रोजगार देणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचा हा मार्ग आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर १०-१२ गाई पाळाव्यात म्हणजे याची गरज पडणार नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. देशात रुपयांचे अवमूल्यन होत असून १ पैसा अवमूल्यन झाले तर देशाच्या तिजोरीवर १२ हजार कोटी रुपयांचा बोजा पडतो. आता देशातील बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी रघुराम राजन यांची मदत घेणार आहेत. ज्या राजन यांना या सरकारने घालवले त्यांची मदत आता हे सरकार घेत आहे. बँकेचा एनपीए वाढतोय त्याला हे सरकार जबाबदार असून कर्ज कंपन्यांकडून वसुल करावे असा सल्ला रघुराम राजन यांनी दिला होता. मात्र तो न ऐकता त्यांना सरकारने घालवले असून आता त्यासाठीच पुन्हा त्यांची मदत घेतली जात असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
COMMENTS