मुंबई – मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले असून प्रजा फाऊंडेशनने जाहीर केलेल्या या रिपोर्ट कार्डमध्ये कामगिरीत काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल तर भाजपचे राम कदम तळाला गेले आहेत. तसेच शिवसेनेचे सुनिल प्रभू दुस-या क्रमांकावर तर भाजपचे अतुल भातखळकर तिस-या स्थानावर आहेत. तसेच भाजपचे तमिळ सेल्वन आणि सेनेचे संजय पोतनीस यांचीही कामगिरी खालावली असल्याचं या रिपोर्ट कार्डमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान विधानसभा सभागृहात मुंबईमधील आमदारांच्या उपस्थितीत १० टक्के घट झाली असून विधानसभेत विचारल्या जाणा-या प्रश्नांची संख्याही खालावली आहे. २४ हजार २९० लोकांचे सर्व्हे घेण्यात आला असून यामध्ये आमदारांवरील दाखल होणा-या गुन्ह्यामध्येही वाढ झाली आहे. 2017 मध्ये 13 आमदारांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. म्हणजे 36 टक्के तर 2018 मध्ये ही संख्या वाढून 44 टक्के म्हणजे 16 आमदारांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या 58 टक्के इतकी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची गुणसंख्या 62 टक्के इतकी होती. २०१७ या कालावधीत झालेल्या ४ अधिवेशनामध्ये राम कदम यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. तसंच त्यांची हजेरीही सर्वात कमी म्हणजे ४७ टक्के आहे. त्यामुळे ते या रिपोर्ट कार्डमध्ये सर्वात शेवटी आहेत.
COMMENTS