सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात, सरकारकडे मदतीची मागणी ! VIDEO

सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात, सरकारकडे मदतीची मागणी ! VIDEO

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणचे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. उसावर हुमणी अळीचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे उसाचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारनं यावर काहीतरी उपाययोजना करावी तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतक-यांकडून केली जात आहे.

उसाच्या मुळीवरच या अळीचा प्रादूर्भाव असल्यामुळे ऊस पीक जळून जात आहे. त्यातली त्यात कारखाने सुरु होण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्व होत्याचं नव्हतं होईल यांची सरकारनं दखल घेऊन वेळीच मदत करण्याची मागणी या शेतक-यांनी केली आहे.

हुमणी अळी आणि तिच्यापासून होणारे नुकासान व उपाय योजना

हुमणी अळीचे व्यवस्थापन जीवनक्रम

या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष, पतंग अशा अवस्थामधून पूर्ण होतो.

अंडी :

एक मादी  सुमारे ५० अंडी जमिनीत ५-१० से.मी. खोलीवर घालते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाला सुरु होताच म्हणजे जूनच्या सुमारास सुरु होतो. १०-१५ दिवसात आली बाहेर पडते.

अळी :

अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पांढरी असते. पूर्ण वाढ झालेली आली पांढरट पिवळी इंग्रजी सी आकाराची असून ती जमिनीत अर्ध गोलाकार आकारात राहते. पुढे ही अळी तीन अवस्थांमधून जाते. यापैकी प्रथमोवस्था 25-30 दिवसांत जून – जुलैमध्ये आढळते. या दरम्यान अळी 45 दिवस व तिसरी अवस्था 140 – 145 दिवस असते. दुसऱ्या अवस्थेतील अळ्या जुलै – ऑगस्ट महिन्यात आढळतात. तिसऱ्या अवस्थेतील अळ्या अतिशय खादाड असतात.

पुढील तीन – चार महिन्यांपर्यंत या पूर्णावस्थेतील अळ्या नुकसान करतात, त्यामुळे खरिपातील ऑगस्ट – सप्टेंबर व रब्बीतील नुकत्याच पेरणीनंतर ऑक्‍टोबरमध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. नंतर स्वतःभोवती मातीचे घर बनवते. कोषावस्था हि जमिनीत खोलवर केली जाते व हि जागा निवडताना ओलावा आहे याच काळजी आली घेते.

कोष :

कोषावस्था २-४ आठवडे चालते. कोषावस्था प्रामुख्याने ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते.

पतंग (भुंगेरा) :

पावसाळा सुरू होताच म्हणजे साधारणतः जून महिन्यातील पहिल्या – दुसऱ्या आठवड्यात भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन, थव्यांच्या रूपाने सूर्यास्तादरम्यान कडुनिंब, बाभूळ या झाडांवर गोळा होऊन त्यांच्या पानांवर उपजीविका करतात. हे भुंगेरे रात्री या वनस्पतीवर उपजीविका करतात व दिवसा जमिनीत राहतात. हे भुंगेरे 90 – 110 दिवस जगतात. प्रौढ भुंगेरे बाहेर आल्यानंतर लगेच मिलनास %

COMMENTS