गुजरात – गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला आहे. मोदींच्या याच बालेकिल्ल्यात विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघातच काँग्रेसनं त्यांच्यासमोर एक नवं अव्हान उभं केलं आहे. बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात नॅशनल स्टुडंस्ट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपची अखिल भारतीय विद्यार्थी संघटना तिस-या स्थानावर फेकली गेली आहे. जीएसच्या महत्त्वाच्या पदावर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटेनेनं विजय मिळवला आहे.
दरम्यान या विजयानंतर गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव यांनी अभिनंदन केलं आहे. हा विजय म्हणजे गुजरातमधील तरुणाईचा कल भाजपविरोधात दिसत असल्याचं सातव यांनी म्हटलं आहे.
Congratulations to @nsui on the remarkable victory in MSU Baroda Student Union Election.This is an indication of the resentment of the youth of Gujarat towards #BJP in home State of PM.Kudos to @INCGujarat for supporting @NSUIGujarat.Proud of Team Gujarat.#NSUIWinsMSUBaroda https://t.co/S0HxocLYFP
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) August 24, 2018
दरम्यान पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढवलेल्या याच मतदारसंघात काँग्रेसनं हा विजय मिळवल्यामुळे भाजपसमोर काँग्रेसचं नवं आव्हान उभं ठाकलं आहे.
COMMENTS