राज ठाकरेंचं शिवसेनेसह सर्व पक्षांना पत्र, निवडणुकीबाबात मांडली भूमिका !

राज ठाकरेंचं शिवसेनेसह सर्व पक्षांना पत्र, निवडणुकीबाबात मांडली भूमिका !

मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये राज यांनीनिवडणूक प्रक्रिया आणि व्हीव्हीपॅट, ईव्हीएम मशीन संदर्भात सूचना कळवल्या आहेत. ईव्हीएम मशन चे अनेक फेरफार उघड झाल्यामुळे राज यांनीही बॅलट पेपरनेच मतदान घेण्याची भूमिका या पत्राद्वारे मांडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत सर्व पक्षांची ईव्हीएमच्या मुद्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशिन यांच्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याच बैठकीत महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया निवडणुक आयोगाला कळवली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान भाजप निवडणुका जिंकत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. हीच भूमिका शिवसेना आणि मनसेची देखील आहे. मतदान हे व्हीव्हीपॅटव्दारे न घेता मतपत्रिकेव्दारेच ही भूमिका सर्व पक्षांची असल्यामुळे या मागणीला शिवसेनेनही पाठिंबा द्यावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

 

COMMENTS