सांगली – जनसंघर्ष यात्रेदरम्यान काल काँग्रेस नेत्यांचा सांधेपणा समोर आला आहे. ही यात्रा सांगली जिल्ह्यातील जत येथे पोहचली असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रस्त्याच्या कडेवरील एका टपरीवर चहा घेतला. तसेच तेथील स्थानिक नागरिक आणि शेतक-यांशी त्यांनी गप्पाही मारल्या. यावेळी शेतक-यांच्या समस्या जवळून अनुभवण्याचा आणि त्या जाणण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला.
Stopped for a cup of tea at Sangli's Kumbhari village. All said that ration is not being distributed fairly or evenly across the region. This BJP-Sena Govenment has been incapable of implementing the UPA's National Food Security Act! pic.twitter.com/RMbQWnYCxH
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 2, 2018
दरम्यान काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज सातारा जिल्ह्यात पोहचली असून कराड याठिकाणी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच हंडी फोडून भाजपच्या पापाचा घडा भरला असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजप सरकारच्या पापाचा घडा जनता फोडेल असंही काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS