बेंगळुरू – कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी दरम्यान काँग्रेस अनेक ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. काही ठिकाणचे निकाल हाती आल्यामुळे विजय मिळवला त्याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मिरवणूक काढली जात आहे. परंतु या मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. तुमकूर येथे काँग्रेस कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असतानाच त्यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असल्याची माहिती आहे.
दरम्यान या हल्ल्यामागे कोण आहे, हल्ल्याचा उद्देश काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून याबाबतचा अधिक तापस केला जात आहे. तसेच आतापर्यंत जाहीर झालेल्या २,२६७ जागांच्या निकालंमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसला ८६४, भाजपला ७८८ तर जेडीएस आणि अपक्षांना २७७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसनं चांगलीच बाजी मारली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS