सांगली – राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश !

सांगली – राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश !

सांगली – कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असून  नगराध्यक्षा सविता माने यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सविता माने यांनी आज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

दरम्यान यावेळी नगराध्यक्षा सविता माने यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या सांगली जिल्ह्यासोबतच कवठेमहांकाळबाबत विकासात्मक वाटचालीस पाठिंबा देवून हा पक्षप्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कवठेमहाकाळमध्ये मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS