मुंबई – सिंधुदुर्गमध्ये विमान उतरवण्यावरुन गेली काही दिवसांपासून श्रेयाचं राजकारण सुरु होतं. हे राजकारण आता संपुष्टात आलं असून 12 सप्टेंबरला विमान उतरण्याचा मुहुर्त पक्का झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. याबाबत विमानतळाची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान उतरणाऱ्या विमानात खासदार नारायण राणे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही एकत्रित प्रवास करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान चाचणी खातर उतरवण्यात येणाऱ्या विमानात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर एकत्र प्रवास करणार असल्याची माहिती आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे या विमानातून प्रवास करणार याबाबत अजून निश्चितता नाही परंतु शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS