मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे शक्य नसल्याचं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच इंधनाचा समावेश जीएसटीत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारनं याबाबत तयारीत असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. सहा महिन्यांपूर्वी इंधनावर आकारलेला अधिभार काही प्रमाणात कमी करून राज्य सरकारने दिलासा दिला असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी राज्याने 3 हजार 67 कोटी रुपयांवर पाणी सोडले असून राजस्थान आणि आंध्र प्रदेशने महाराष्ट्राचे अनुकरण केलं असल्याचा दावाही मुनगंटीवार यांनी केला आहे.
दरम्यान राजस्थान आणि आंध्र प्रदेश सरकारने काही प्रमाणात विक्रीकरात सूट देत तेथील नागरिकांना दिलासा दिला आहे. याच धर्तीवर राज्य सरकारनेही विक्रीकर कमी करण्याची सर्व स्तरातून मागणी केली जात आहे. परंतु मुनगंटीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
COMMENTS