मुंबई– देशातील आमदारांच्या वार्षिक उत्पन्नाची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील एकूण ३१४५ आमदार असून यामध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांच्या यादीत महाराष्ट्रातील चार आमदारांनी स्थान मिळवले आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर प्रख्यात उद्योगपती तथा भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचे नाव असून त्यांनी व्यवसाय म्हणून नोकरी दाखवली आहे. यामध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी दाखवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल हे सहाव्या क्रमांकावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न ९.८५ कोटी दाखवण्यात आलं असून वकील आणि शेतकरी हा व्यवसाय त्यांनी दाखवला आहे.
दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे १७ व्या स्थानावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न ५.६१ कोटी दाखवण्यात आलं आहे. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न ४.५६ कोटी असून त्यांनी शेती हा व्यवसाय दाखवला आहे.
दरम्यान देशात सर्वाधिक कमाई असणारे आमदार एन. नागराजू हे असून त्यांचं वार्षिक उत्पन्न १५७.०४ कोटी एवढं आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या टॉप २० आमदारांच्या यादीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे असून त्यांचं वार्षिक उत्पन्न ९.०९ लाख आहे.
COMMENTS