विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, पण….  – सुप्रिम कोर्ट

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, पण…. – सुप्रिम कोर्ट

दिल्ली – विविहबाह्य अनैतिकं संबंधाबाबत सुप्रिम कोर्टाने आज एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार विवाहित पुरुषाने परस्त्रिशी ठेवलेले शाररीक संबंध हा गुन्हा नाही असा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. विवाहबाह्य संबंध व्याभिचार आहे मात्र तो यापुढे गुन्हा नाही. हा अपराध होऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ ही कोर्टाने अवैध ठरवलं आहे.

यापूर्वी असे संबंध गुन्हा ठवले जात होते. मात्र विवाहित महिलांनी ठेवलेले शाररीक संबंध हे गुन्हा ठरवले जात नव्हते. महिला – पुरुष यांच्या कायदा भेदभाव करत नाही तर मग याबाबत पुरुषांनाच दोषी का ठरवले जाते अशा अशायाची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने हा निकाल दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने गुरुवारी या याचिकेवर निर्णय दिला. न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता.

व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. जगातील बहुतांशी देशांमध्ये व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम रद्द करण्यात आले. भारतीय दंड विधानातील हे कलमच असंवैधानिक असल्याचे कोर्टाने सांगितले. विवाबाह्य संबंध हा गुन्हा न ठरविल्यास विवाह संस्थांमध्ये वादळ निर्माण होईल, अॅडल्ट्रीला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढल्यास विवाहाचं पावित्र्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होईल. तसंच विवाह संस्थांमध्ये वादळं येतील, असं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. ४९७ कलमांमुळे देशातील लग्नसंस्था टिकून आहेत, हे कलम नसेल तर लग्नसंस्था कमकुवत होतील, असेही केंद्र सरकारने म्हटले होते.

COMMENTS