भाजपमधील बलात्कारी लोकांविरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे – संजय निरुपम VIDEO

भाजपमधील बलात्कारी लोकांविरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे – संजय निरुपम VIDEO

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांच्याविरोधात महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. त्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भाजपवर काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. मधू चव्हाण यांच्यावर यापूर्वीही बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. परंतु त्याकडे भाजपनं दुर्लक्ष केलं. तसेच आताही भाजपकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतरही भाजपनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अशाप्रकारचे कृत्य करण्याची सवय भाजपला लागली असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे. तसेच भाजपमधील या बलात्कारी लोकांवर सक्त करावाई झाली पाहिजे असं देखील निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपचे ज्येष्‍ठ नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्याविरोधात चिपळून पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शैक्षणिक संस्थेतील महिला कर्मचा-याला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मधु चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सन 2002 ते 2017 सालामध्ये विविध ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. चिपळूण कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी मधू चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा केला आहे.

COMMENTS