सोलापूर – सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपरा या कादंबरीचे लेखक लक्ष्मण माने यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोलापुरातील युवक पैशासाठी खूप लोभी असून पैशासाठी तरुण टोळके करुन फिरतात. मतदानापूर्वीर हे तरुण मतासाठी पैसे घेतात असं वक्तव्य माने यांनी केलं आहे. तसेच मत विकायचे नाही. विकायचे असेल तर जास्त किंमतीला विकत घ्यायचे. किरकोळ पैशात विकले जायचे नाही. भरपूर पैसे घ्यायचे. मतदान करताना पाकीटासोबतच चपटी (दारुची बाटली) घ्या काहीही हरकत नाही. असंही माने यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.
दरम्यान एका मताची किंमत दहा हजार रुपये घ्यायची. सोलापुरात पाकीट संस्कृती आहे. पाकीट आल्याशिवाय कोणीच बाहेर पडत नाही. पाकीट आल्याशिवाय कोणीही मतदान करत नाही. तसेच ज्यांनी सरकारच्या बॅंका, तिजोरी लुटली, त्यांच्याकडून पैसे घ्या असा सल्लाही यावेळी माने यांनी सोलापूरकरांना दिला आहे.
COMMENTS