नवी दिल्ली – आज पाच राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यात विधानसभेच्या निवडणूका होणार असून तेलंगणमधील निवडणुकीच्या तारखाही आजच जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलं आहे.
Election Commission to announce dates of the upcoming assembly polls in a press conference later today pic.twitter.com/k5UNlRRRKe
— ANI (@ANI) October 6, 2018
दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागच्या पंधरा वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही भाजप आपली सत्ता टिकवून ठेवणार का हे पाहणं गरजेचं आहे.
सध्याचं वातावरण भाजपविरोधात दिसत असल्यामुळे या निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. राफेल विमानाच्या खरेदी व्यवहारावरुन भाजप सरकावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणूक जिंकण भाजपसमोर मोठ आव्हान असणार आहे.
COMMENTS