नवी दिल्ली – पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचा घाट घातला असून ही एक अयशस्वी कल्पना असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच या महागठबंधनमधील पक्ष हे एकमेकांसोबत नेहमी भांडत असतात. परंतु जेव्हा त्यांना सरकार स्थापण्याची एखादी संधी दिसते तेव्हा ते एकत्र येतात अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली आहे. तसेच ”आम्ही’ सुख वाटणारे आहोत, तर ‘ते’ समाज वाटणारे असून आता ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी हे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तणावाचे वातावरण निर्माण करुन एकमेकांमध्ये भांडणं लावून देतील असंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे. ते मोदी ऍपवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
दरम्यान अटलजींनी सगळ्यांना विश्वासात घेऊन छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची विभागणी केली आणि एकच भाषा बोलणाऱ्या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवून टाकलं असल्याचा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदींनी केला आहे.
COMMENTS