गोवा – नव्या नेत्याबाबत आज दिल्लीत होणार घोषणा, यांची नावे चर्चेत ?

गोवा – नव्या नेत्याबाबत आज दिल्लीत होणार घोषणा, यांची नावे चर्चेत ?

गोवा –  मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गेली काही दिवसांपासून प्रकृती ठिक नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे. परंतु त्यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झाली नसल्याची माहिती आहे. अशातच काँग्रेसनं सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. परंतु यामध्ये काँग्रेसला यश आलं नाही. पर्रिकरांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असली तरी त्यांना मुख्यमंत्री पदावरुन न हटवण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. परंतु मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि इतर पदावर नवीन नेत्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला आहे. त्याबाबत आज दिल्लीत बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान पक्षाकडून पक्ष संघटन, लोकसभा निवडणुका, सक्षम सरकार आणि गोव्याचा विकास यावर चर्चा करण्यात आली आहे. नव्या नेतेपदासाठी विश्वजित राणे यांचे नाव आघाडीवर असून या शर्यतीत डॉ प्रमोद सावंत आणि विनय तेंडुलकर यांचीही नावे चर्चेत आहेत. सुरुवातीला नव्या नेत्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपविले जाणार असून प्रशासन गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. याबाबत घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS