मुंबई – शिवसनेची आज दुपारी अत्यंत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे यांची अयोध्यावारी, विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन तसंच भाजपप्रणित राज्य सरकारची चौथी वर्षपूर्ती या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतंय. दुपारी 12 वाजता ही बैठक होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिर निर्माणाचा मुद्दा कळीचा ठरणार असून शिवसेनेनं या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याची तयारी सुरु केलीय. 25 तारखेला होत असलेल्या उध्दव ठाकरेंच्या अयोध्यावारीच्या माध्यमातून शिवसेनेनं राष्ट्रीय स्तरावर शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरु केलीय. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे पक्षातील त्यांच्या सहकाऱयांना बैठकीत महत्वाच्या सूचना करतील, दौऱ्याची रूपरेषा आणि व्यूहरचनेची आखणी होईल असं सांगितलं जातेय.
COMMENTS