बीड, परळी – यावर्षीची संपुर्ण दिवाळी शेतकरी, कष्टकरी, दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणुन घेवुन त्यांच्यासमवेत साजरी करत असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे असलेल्या गुरूदास सेवा या वृध्दाश्रमात येथील वृध्द मंडळींसोबत दिवाळीचा सण साजरा केला. त्यांच्यासोबत दिवाळीचा फराळ घेताना त्यांनाही नवीन कपडे तसेच हिवाळ्यासाठी लागणार्या गरम कपड्यांचे वाटपही करण्यात आले.
परळीपासुन जवळच असलेल्या घाटनांदुर येथील गुरूदास सेवा आश्रमात अनेक वृध्द महिला, पुरूष, निराधार राहत आहेत. या आश्रमाचे पालकत्व धनंजय मुंडे यांनी स्विकारले असुन आज दिवाळी भाऊबीजीचे औचित्य साधत त्यांनी आश्रमाला भेट देवुन या वृध्द मंडळीं समवेत दिवाळीचा फराळ केला. त्यांच्याशी आस्थेवाईक पणे चर्चा केली तसेच वृध्द महिलांना साडी-चोळी, पुरूषांना धोती-कपडे, टॉवेल, हिवाळा असल्याने चादर असे गरम कपड्यांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या तर्फे कै.पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या हायमास्ट दिव्यांचे लोकार्पणही यावेळी मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वृध्दाश्रमात राहणार्यांना त्यांच्या पालकांनी एकटे सोडले असले तरी मी त्यांचे पालकत्व आता घेतले आहे. केवळ आश्रमाला आर्थिक मदत करणे, त्यांना दैनंदिन लागणार्या गोष्टी देणे पेक्षा ही त्यांना या वयात आवश्यक असणारी आपुलकी आणि मायेची चादर देण्याचे काम मी आयुष्यभर करीत राहणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या छोटेखानी कार्यक्रमास आश्रमाचे उपाध्यक्ष नरहरी मंठेकर, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, सरचिटणसी सुरेश टाक, बाजीराव धर्माधिकारी, अध्यक्ष नामदेव महाराज, ज्ञानोबा बप्पा जाधव, शिवाजीराव सिरसाट, मच्छिंद्र वालेकर, बाळासाहेब देशमुख, बाबुराव जगताप सर, बन्सीधर जाधव, गणेशभैय्या देशमुख, ओमसेठ सारडा, बाळासाहेब राजमाने, अॅड.मनजित सुगरे, शेख मुर्तजा, पांडुरंग मिसाळ, उत्तम शिंगाडे, परमेश्वर कांबळे, यशवंतराव गित्ते, केशवराव आघाव, आनंत इंगळे, पत्रकार विश्वजित गंडले, संजय राणभरे आदी उपस्थित होते.
*संपुर्ण दिवाळी पिडीतांसमवेत *
धनंजय मुंंडे यांनी यावर्षी आपली संपुर्ण दिवाळी शेतकरी, कष्टकरी आणि पिडीतांसमवेत घालवली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, त्यांच्याशी चर्चा, पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या ऊसतोड कुटुंबियांचे सांत्वन, पेन्शनर नागरिकांसोबत फराळ, व्यापार्यांच्या गाठी-भेटी आणि आज वृध्दाश्रमातील वृध्दांशी संवाद अशा प्रकारे त्यांनी आपला सण साजरा केला.
COMMENTS