मध्य प्रदेशातील भाजपचे माजी मंत्री, विद्यमान आमदार शिवसेनेत, मातोश्रीवर झाला पक्ष प्रवेश !

मध्य प्रदेशातील भाजपचे माजी मंत्री, विद्यमान आमदार शिवसेनेत, मातोश्रीवर झाला पक्ष प्रवेश !

मुंबई – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या आजी-माजी आमदारांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे माजी गृह राज्यमंत्री जगदीश मुवेल आणि भाजपचे विद्यमान आमदार कालू सिंह ठाकूर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. धारल जिल्ह्यातील मनावर आणि धर्मपुरी येथून भाजपनं उमेदवारी दिली नसल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांची आपल्या मतदारसंघातील पकड मजबूत असतानाही पक्षानं उमेदवारी दिली नसल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आज मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

धरमपुरी इथले विद्यमान आमदार कालुसिंह ठाकूर आणि भाजपाचे मध्य प्रदेशातील माजी गृहमंत्री जगदीश मुवेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश. भाजपा जे बोलते ते करत नाही त्यामुळे भाजपासोबत नाराजी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत हे आम्हाला भावले त्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे.

शिव व्यापारी सेनेच्या पुढाकाराने या दोन्ही नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात शिवसेनेची ताकद वाढली आहे तर भाजपला मात्र निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS