पंढरपूर – काँग्रेसकडून आघाडीत सामील होण्याचा निरोप येत आहे. परंतु आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही, आमच्यासोबत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे असं वक्तव्य भारिप बहूनज महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे धर्मिकतेकडे झुकत आहेत. मठ आणि मंदिरे यांना भेटी देत आहेत याआधी त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी असं कधीही केलं नव्हतं असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच पदावर असणार आहात तोपर्यंत जी नाटकं करायची आहेत ती करा त्यानंतर तुम्ही पदावर नसाल पुढच्या टर्मला तुम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री नसणार असल्याचा दावाही यावेळी आंबेडकर यांनी केला आहे.
मनोहर भिडेंना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे पुढच्या ऑक्टोबरपर्यंत काय नाटकं करायची आहेत ती करा असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सध्या काँग्रेस आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासाख्या बड्या नेत्यांचेही आपल्याला निरोप येत असतात असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तसेच काँग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी हातमिळवणी करावी. लोकसभेच्या अनेक जागांवर द्यायला काँग्रेसकडे चांगले उमेदवार नाहीत. तडजोड किंवा समजुतीच्या मार्गाने हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
COMMENTS