खासदार सचिन तेंडूलकर यांनी दत्तक घेतलेल्या गावात अवैध दारुचा सुळसुळाट ! VIDEO

खासदार सचिन तेंडूलकर यांनी दत्तक घेतलेल्या गावात अवैध दारुचा सुळसुळाट ! VIDEO

उस्मानाबाद – खासदार सचीन तेंडूलकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा हे गाव दत्तक घेतले होते. हे गाव सध्या अवैध दारुमुळे चर्चेत आलं आहे. या गावात अवैध दारुचा सुळसुळाट सुरु झाला आहे. यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.

दरम्यान आता हे गाव पुन्हा एकदा नव्या चर्चेत आलं असून क्रिकेटचा देव गावात येणार म्हणून विविध योजना गावात झाल्या आहेत. रस्ते, पाण्याची सोय आदींसह शाळेचे इमारतीही झाली आहे. मात्र गावात अवैध दारुचा सुळसुळाट झपाट्याने वाढला आहे. याला ग्रामस्थही कंटाळले आहेत. पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही उपायोजना होत नसल्याने या गावातील ग्रामस्थांनी सोमवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालायाच्या समोर पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत अवैध दारु बंद करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. खासदार तेंडूलकर यांनी दत्तक घेतलेल्या या गावामध्ये अशा प्रकारे अवैध दारुला ग्रामस्थ कंटाळल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर जिल्हाभरातून नाराजीचा सूर मांडला जात आहे.

COMMENTS