नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनोखा सल्ला दिला आहे. सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा आणि मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून बुधवारी कळवण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी शेतक-यांना हा सल्ला दिला आहे.
नाशिक: "शेतक-यांसाठी फक्त आपणचं मार्ग काढू शकता." असा दृढ विश्वास व्यक्त करत सटाणा येथे पिडीत शेतक-यांनी राजसाहेबांकडे व्यथा मांडल्या.
"माझा संपूर्ण पक्ष शेतक-यांच्या या लढ्यात खांद्याला खांदा लावून पूर्णपणे लढेल." – राजसाहेब ठाकरे. #शेतकऱ्यांचीमनसे #राजठाकरे_महाराष्ट्रदौरा pic.twitter.com/iRxY2yo7Tu— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 19, 2018
दरम्यान कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा निम्म्याने पडले असून राज्यातील गंभीर बनत असलेल्या कांदा उत्पादकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. उत्पादन खर्च प्रति क्विंटल १००० रुपये असताना बाजारात कांदा कवडीमोलाने विकला जात आहे.
भाव घसरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निफाडमधील संजय साठे यांनी ७५० किलो कांदा विक्रीतून मिळालेले १०६४ रुपये थेट पंतप्रधान कार्यालयास ‘मनिऑर्डर’ करून शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरीही सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे या शेतक-यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
COMMENTS