मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता त्यांचे बंधू आणि आमदार नितेश राणे यांनीही शिवेसनेला इशारा दिला आहे. अंगावर आले तर शिंगावर घेणारच, आमच्या नादी लागायचं नाही, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. आम्ही सगळे निलेश राणे यांच्या पाठिशी असून आमच्या नादी लागू नका असं नितेश राणे यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आम्ही सगळे आमचे नेते नीलेश राणेंच्या मागे आहोत!!
अंगावर आले तर शिंगावर घेणारच..
आमच्या नादी लागायच नाही!!— nitesh rane (@NiteshNRane) January 15, 2019
दरम्यान काल नीलेश राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तसेच गायक सोनू निगम यालाही शिवसेनेनं मारण्याचा प्रयत्न केला होता असा आरोपही निलेश राणे यांनी केला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर निलेश राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.
COMMENTS