राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांना पाठणार घुंगरु !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांना पाठणार घुंगरु !

मुंबई – डान्सबारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी दिली आहे.सुप्रीम कोर्टाने राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान डान्सबारच्या निर्णयासंदर्भात महाराष्ट्र सरकार न्यायालयात भक्कम बाजु मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप अजित पवार, धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर फौजिया खान यांनी मुख्यमंत्र्यांना घुंगरु पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. आबांनी डान्सबार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. परंतु या डान्सबार बंदीबाबत सरकारला न्यायालयात भक्कम बाजु मांडता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली असे फौजिया खान यांनी सांगितले आहे.

COMMENTS