अण्णा हजारेंचं उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या !

अण्णा हजारेंचं उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या !

अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. विविध मागण्यांवरुन गेली सात दिवसांपासून अण्णांचं उपोषण सुरु होतं.राळेगणसिद्धी या ठिकाणी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे आणि अण्णा हजारे यांची सुमारे सहा तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. त्यानंतर अण्णांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.

दरम्यान लोकपालच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लोकायुक्तासंदर्भात १३ फेब्रुवारीला बैठक बोलवण्यात येईल त्यामध्ये चर्चा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अण्णांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत आणि आम्हाला त्या मान्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

लोकपालच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातल्या कायद्याची नव्याने पुनर्रचना अण्णांच्या या दोन प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच इतर मागण्यांवरही सरकारने सहमती दर्शवली आहे ज्यामुळे मी समाधानी आहे आणि उपोषण मागे घेत असल्याची अण्णांनी केली आहे.

 

COMMENTS