राहुल गांधींची डोकेदुखी वाढली, अशोक चव्हाणांसह ‘या’ नेत्यांचा निवडणूक लढण्यास नकार !

राहुल गांधींची डोकेदुखी वाढली, अशोक चव्हाणांसह ‘या’ नेत्यांचा निवडणूक लढण्यास नकार !

नवी दिल्ली-  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसत आहे. कारण राज्यातील जवळपास आठ ते दहा काँग्रेस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह अनेकांनी लोकसभा निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. राज्यातील या नेत्यांच्या नकारामुळे राहुल गांधी यांना मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागणार असल्याचं दिसत आहे.

या नेत्यांचा निवडणूक लढण्यास नकार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री मिलींद देवरा, प्रिया दत्त, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासोबत आणखी काहीजण निवडणूक लढवण्यास अनुत्सुक असल्याची माहिती आहे.

दरम्यान 2014मध्ये मोदी लाटेत राज्यातील 48 पैकी काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यात विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून तर राजीव सातव यांनी हिंगोलीतून विजय मिळवला होता. यातील अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोघेही लोकसभा निवडणुक लढवण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS