मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीडच्या खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३५६ किमीचे रस्ते मंजूर करून आणले आहेत. दहा तालुक्यातील रस्त्याच्या ९६ कामांना ग्रामविकास विभागाने नुकतीच मंजूरी दिली असून हे सर्व ग्रामीण रस्ते त्यांच्या प्रयत्नांमुळे चकाचक होणार आहेत.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी जिल्हयात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून मुंडे भगिनींच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हा सध्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे. खासदार या नात्याने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या विकास व संशोधन (आर अॅन्ड डी ) अंतर्गत जिल्हयातील दहा तालुक्यात ३५६ किमी लांबीच्या ९६ रस्ता कामांना मंजूरी दिली आहे. लवकरच या रस्ता कामाचा शुभारंभ होणार आहे.
या तालुक्यात होणार रस्ते
खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या शिफारशी मुळे ज्या रस्ता कामांना मंजूरी मिळाली आहे ती तालुकानिहाय कामे पुढीलप्रमाणे, कंसातील आकडे किलो मीटरचे – *परळी तालुका*- प्ररामा 16 ते भिलेगांव रस्ता (15 किमी), रामा 211 ते चोपनतांडा (3.50 किमी), रामा 56 ते नागदरा (8 किमी), प्ररामा 16 ते जयगांव (5.10 किमी), रामा 221 ते लोणारवाडी (4.50 किमी), रामा 211 ते तेलसमुख (10 किमी), रामा 211 ते बोरखेड (7.50किमी), रामा 221 ते अंबलटेक (5 किमी), रामा 235 ते कौडगांव तांडा (7 किमी), प्ररामा 16 ते कौडगांव साबळा (4.50 किमी), रामा 234 ते गुट्टेवाडी (6 किमी), प्ररामा 16 ते रेवली (2 किमी), प्ररामा 16 ते टाकळी देशमुख (3 किमी), रामा 64 ते भोपळा (2.25 किमी), पठाण मांडवा ते वानटाकळी-दौनापूर- नागापूर (7 किमी), इजिमा 137 ते वानटाकळी तांडा (2 किमी), प्ररामा 16 ते लिंबुटातांडा-नागापूर (6 किमी), पौळपिंप्री ते ममदापूर (2 किमी), ममदापूर ते बोरखेड-तेलसमुख- कासारवाडी (3.50 किमी), रामा 235 ते जिगानाईकतांडा – सोनहिवरा (3 किमी), परळी ते दाऊतपूर (2.50 किमी), परळी ते कासारवाडी (3.50 किमी), रामा 221 ते लोणारवाडी (3 किमी), प्ररामा 16 ते जयगाव-वांगी (3.50 किमी), पठाण मांडवा ते वानटाकळी (3.50किमी) (एकुण 122.85 किमी)
अंबाजोगाई तालुका
रामा 221 ते चतुरवाडी (1.50 किमी), रामा 56 ते शेपवाडी (0.60 किमी), रामा 232 ते वाघाळा (0.60 किमी), प्रजिमा 58 ते लिंबगाव तांडा (1 किमी), रामा 56 ते गुंडरे वस्ती (1.50 किमी), रामा 56 ते मुरकुटवाडी (1 किमी), रामा 232 ते केंद्रेवाडी (1 किमी), रामा 211 ते कुरणवाडी तांडा (0.50 किमी), रामा 232 ते धावडी (3.50 किमी), रामा 56 ते हनुमंतवाडी (1 किमी), इजिमा 93 ते दैठणा (1 किमी), अंबाजोगाई ते चिचखंडी- राक्षसवाडी ते तालुका सरहद (11 किमी), रामा 232 ते कांदेवाडी (2.50 किमी), प्रजिमा 57 ते भतानवाडी (3 किमी), रामा 232 ते भवानवाडी (2.50 किमी), इजिमा 87 ते सेलु अंबा (6 किमी), रामा 232 ते मुडेगाव (6.50 किमी), रामा 56 ते वाघाळा (7 किमी), रामा 56 ते मगरवाडी (3 किमी), प्रजिमा 51 ते राजेवाडी (3.50 किमी), इजिमा 57 बर्दापूर ते लिंबगावतांडा (3 किमी), रामा 56 ते उमरी (4.50 किमी), इजिमा 135 भावठाणा ते इजिमा 85 सोनवळा (3 किमी), इजिमा 136 भावठाणा ते पवार वस्ती (2 किमी), प्रजिमा 51 ते केंद्रेवाडी (3.50 किमी), प्रजिमा 45 माकेगांव ते पाटोदा (5 किमी), सुगाव ते राडी (5 किमी), रामा 232 ते भवानवाडी (2.50 किमी) (एकुण 86.70 किमी).
आष्टी तालुका
रामा 70 ते बडेवाडी (3 किमी), प्ररामा 16 ते धामणगांव फाटा – हातोला (1.25 किमी), रामा 70 ते बावी कावळे वस्ती (2 किमी), लिंबुडी ते वनवे वस्ती (1 किमी), ग्रामा 21 ते धामणगांव- दडेगाव (5 किमी)- एकुण (12.25 किमी)
केज तालुका
रामा 56 ते चंदन सावरगाव-जवळबन- आवसगांव (7 किमी), झोला ते पिंपळगाव (3.50 किमी), शिंदेफाटा ते गप्पेवाडी (8 किमी),रामा 222 विडा ते अांधळेवाडी (3 किमी), रामा 56 ते पिसेगाव-जानेगाव- गांजपूर- उंदरी- आडस (12 किमी), आडस ते कळंब अंबा- केकत सारणी-चंदनसावरगांव (7.50 किमी), तांबवा ते गांजपूर (4.50 किमी), प्रजिमा 18 ते सांगवी-बेलगांव-अरणगांव (5.50 किमी) एकुण (51.00 किमी )
धारुर तालुका
प्ररामा 16 ते चाटगाव (2 किमी), खडकी ते टोकेवाडी- कोरड्याचीवाडी (7 किमी), एकुण (9 किमी)
पाटोदा तालुका
रामा 55 ते करंजवन-वडझरी (10.50 किमी), रामा 62 ते बांगरवाडी (1.50 किमी), कुसळंब ते घुलेवाडी-सौताडा (3 किमी), प्रजिमा 13 ते जिरेवाडी (1 किमी) , रामा 56 ते खंडाळा (3 किमी), एकुण (19 किमी)
बीड तालुका
रामा 56 ते खर्डेवाडी (4 किमी), प्रजिमा 32 ते कारेगव्हाण (2.20 किमी), रामा 56 ते रत्नागिरी (3 किमी), इजिमा 49 ते मांडवखेल(3 किमी), इजिमा 47 ते मांडवजळी (2.50 किमी), राष्ट्रीय महामार्ग 211 ते धनगरवाडी (3 किमी), वंजारवाडी ते भगवाननगर (1.50 किमी), आहेरधानोरा ते राम मंदिर- इंगोले वस्ती वरवटी (3 किमी), तिप्पटवाडी ते चर्हाटा (5 किमी), प्ररामा 16 ते फड वस्ती (3 किमी), इजिमा 115 ते फुकेवाडी (3 किमी), एकुण (33.20 किमी)
माजलगांव तालुका
इजिमा 124 ते चोपनवाडी (2 किमी), एकुण (2 किमी)
वडवणी तालुका
प्रजिमा 18 ते रुई (1.50 किमी), रामा 232 ते शेरी तांडा (1.50 किमी), प्रजिमा 18 ते वंजारवाडी (1 किमी), चिखलबिड ते कुटेवाडी-कोरडेवाडी (3 किमी), प्रजिमा 41 ते चिंचाळा- नागरगोजे वस्ती (1.50 किमी), एकुण (8.50 किमी)
शिरुरकासार तालुका
– रामा 59 ते बडेवाडी (2.50 किमी), प्रजिमा 13 ते दत्तनगर (1.50 किमी), वारणी ते मांगोबा वस्ती (2 किमी), बांगरवाडी ते गणेशवाडी (2 किमी), पाडळी ते आनंदगांव (एकुण 11.50 किमी) असे दहा तालुक्यातील एकूण ३५६ किमीचे रस्ते ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहेत.
COMMENTS