मुंबई – आजची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. आचारसंहितेपुर्वीची ही शेवटची मत्रिमंडळ बैठक असल्याने सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असल्याचं दिसत आहे. आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 25 निर्णय निकाली लावण्यात आले आहेत.
दरम्यान सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. तर राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. याबरोबरच इतरही काही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
COMMENTS