लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र, उद्या घोषणा होणार?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र, उद्या घोषणा होणार?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या राज्याच्या मंत्रिमंडळाची अचानक बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत विधानसभा भंग होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सरकारच्या वरिष्ठ पातळीवर विधानसभा एकत्र घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भाजपाने लोकसभेबरोबर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्याची माहिती असून, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघांसाठी सरासरी 10 कोटींचा निधी गेल्या काही दिवसात दिला गेला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आपापल्या नियोजित काळानुसारच होणार असल्याचं याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडणार अहे. या बैठकीदरम्यान निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे.

मात्र विधानसभा निवडणुका वेळेनुसार होणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहे. ‘मी लिहून देतो, विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वी होणार नाहीत’ अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली आहे.

COMMENTS