आधी पाणी द्या, नंतर २ कोटींचा रस्ता करा, भाजप नगरसेवकाला नागरिकांनी सुनावले ! VIDEO

आधी पाणी द्या, नंतर २ कोटींचा रस्ता करा, भाजप नगरसेवकाला नागरिकांनी सुनावले ! VIDEO

बदलापूर – बदलापूरमध्ये नागरिकांनी भाजप नगरसेवकाला चांगलेच धारेवर धरले असल्याचं समोर आलं आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक किरण बावसकरला यांना स्थानिक नागरिकांनी धारेवर धरले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आधी पाणी द्या नंतर २ कोटींचा रस्ता करा, असं म्हणत नागरिकांनी नगरसेवकाला सुनावले आहे.

मनाली पार्क भागात चार दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांनी नगरसेवकांवर आपला रोष काढला आहे. नागरिक जाब विचारतांना हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आधी पाणी द्या अशी मागणी या नागरिकांनी नगरसेवकाला केली आहे.

COMMENTS