नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ दुसरी यादीही जाहीर करण्यात आली असून या यादीत फक्त एकाच उमेदवाराचं नाव आहे. पहिल्या यादीत भाजपने 182 उमेदवारांची घोषणा केली होती. परंतु दसय्रा यादीत मात्र एकाच उमेदवाराचं नाव असल्यामुळे भाजपनं देशातील एकूण 183 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
दरम्यान भाजपच्या दुसऱ्या यादीत दमण दीव या केंद्रशासित राज्यातील एकमेव उमेदवाराची घोषणा केली आहे. दमण दीवमधून भाजपकडून लालूभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेसाठी भाजपने खास दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे.
BJP releases 2nd list of candidate for upcoming Lok Sabha elections – Lalubhai Patel to contest from Daman & Diu Parliamentary constituency. The voting for the constituency will be held on 23rd April in the 3rd phase of polling. pic.twitter.com/GsT37uknlm
— ANI (@ANI) March 21, 2019
दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत राज्यातील एकूण 16 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या उमेदवारांची नावे जाहीर
नंदूरबार – हिना गावीत
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली – अशोक नेते
चंद्रपूर – हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दावने
भिवंडी – कपील पाटील
मुबंई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे
बीड – प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकर शृंगारे
सांगली – संजय पाटील
COMMENTS