संजय काकडेंची नाराजी दूर, काँग्रेस प्रवेशही टळला !

संजय काकडेंची नाराजी दूर, काँग्रेस प्रवेशही टळला !

मुंबई – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची नाराजी दूर झाली असल्याचं दिसत आहे. कारण काकडे आज भाजपचे नेते सुभाष देशमुखांसह वानखेडे स्टेडियमवर होते. त्यामुळे काकडेंची नाराजी दूर झाली असल्याची चर्चा असून त्यांचा काँग्रेस प्रवेशही टळला आहे. याबाबत थोड्याच वेळात घोषणा केली जाणार असून काकडे यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झाली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून संजय काकडे हे भाजपवर नाराज होते. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, तसेच मल्लीकार्जून खर्गे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु काकडे यांची नाराजी आता दूर झाली असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS