मुंबई – भाजप शिवसेनेनं एकमेकांवर साडेचार वर्ष अत्यंत विखारी टीका करुन पुन्हा युती करण्यापर्यंत आणि अगदी एकमेकांना उमेदवारांची देवघेव करण्यापर्यंतचं एक वर्तुळ पूर्ण केलंय. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भाजप शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये कमालीचं मनोमिलन झालं आहे. अर्थात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्यापर्यंत ते मनोमिलन किती झिरपतं ते निकालातच दिसून येईल. राज्यात हे झालेलं असताना राज्याबाहेर मात्र शिवसेनेनं भाजपविरोधात काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेनं काल उत्तर प्रदेशातील पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
या पाच उमेदवारांमध्ये बरेली मतदारसंघातून अभिनेत्री तुलसी चौधरी यांना तिकीट देण्यात आलंय. मेऱठमधून आरती आग्रवाल यांना तिकीट देण्यात आलंय. अयोध्या मतदारसंघातून मात्र अजून तिकीट जाहीर करण्यात आलेलं नाही. शिवसेनेनं अयोध्येतून उमेदवार उतरवण्याचे सूतोवाच यापूर्वीच केले होते. त्यामुळे अयोध्येतून शिवेसना उमेदवार उभा करते की नाही याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे गोव्यात दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. दोन्ही ठिकाणी पक्षाने यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली आहे.
COMMENTS