मुंबई – सांगली लोकसभा मतदातसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विशाल पाटील हे येत्या 2 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या मतदारसंघातुन कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं होतं. खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.
दरम्यान या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याठिकाणी विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर या मतदारसंघातून कोणत्याही स्थितीत निवडणूक लढणार असल्याचा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी देखील केला आहे. त्यामुळे पडळकर यांची भूमिका काय असणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही ही निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यामुळे सांगली मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS