नवी दिल्ली – भाजपाचे विद्यमान खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना पाटना लोकसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.गेली काही दिवसांपासून सिन्हा यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. वरिष्ठ नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली होती. परिणामी, त्यांना पक्ष नेतृत्वानं पाटनातून उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi: Veteran actor and BJP MP Shatrughan Sinha joins Congress in presence of Congress General Secretary KC Venugopal and Randeep Surjewala pic.twitter.com/T1izPmSEEu
— ANI (@ANI) April 6, 2019
दरम्यान भाजपाच्या स्थापना दिनीच जड अंतकरणाने मला माझा जुना पक्ष सोडावा लागत आहे. मात्र, यामागचे कारण सर्वांनाच माहिती आहे. भारतरत्न नानाजी देशमुख, महान पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आमचे मित्र-तत्वज्ञ-गुरु-मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या निष्ठावंत मार्गदर्शकांचा भाजपा सोडताना दुःख होत असल्याची भावना यावेळी सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS