मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद मिटला, बारणे-जगताप एकत्र!

मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद मिटला, बारणे-जगताप एकत्र!

मावळ – मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद अखेर मिटला असून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांचं मनोमिलन झालं आहे. त्यामुळे याठिकाणचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांची डोकेदुखी वाढवणारं असल्याची शक्यता आहे.

दरम्यान श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता. पण आता अखेर मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद मिटला आहे. दोघांध्ये जे काही गैरसमज होते ते दूर झाले असून देशहितासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं आमदार जगताप यांनी म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीतही बारणे यांना मोठ्या मतांनी निवडून आणणार असल्याचा विश्वासही यावेळी जगताप यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS