नवी दिल्ली – दिल्ली लोकसभेसाठी काँग्रेसने आपल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. दिल्लीत लोकसभा निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि आप एकत्र येणार अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसमधील दिल्लीतील नेत्यांनी आपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर आपसोबत न जाण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसकडून यांना उमेदवारी जाहीर
काँग्रेसने उत्तर पूर्व दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अजय माकन, चांदनी चौक येथून जे. पी अग्रवाल, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंग लवली, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोथिया, पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. आता दिल्लीत भाजपा विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
COMMENTS