…तर मुंडे साहेबांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती – धनंजय मुंडे

…तर मुंडे साहेबांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती – धनंजय मुंडे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भाजपचे दिवंगत नेते आणि त्यांचे चुलते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली आहे. राज्याच्या विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माझे काम पाहिले असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप निश्चित दिली असती, असे भावूक विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान २०१४ च्या निवडणुकीत जनतेला अनेक आश्वसनं देऊन मोदी सरकारनं सत्ता मिळवली. पण सत्ता आल्यावर भाजपाला आश्वासनांचा विसर पडला आहे. या आश्वासनांवर भाजपाकडून कोणताही नेता या निवडणुकीत बोलत नाही. देशात आणि राज्यात कोणती विकास कामे केली, या मुद्यावर न बोलता ते शहीद जवानांच्या नावावर मते मागत असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS