जवान तेज बहादूर यांना बीएसएफने केले निलंबित

जवान तेज बहादूर यांना बीएसएफने केले निलंबित

सैन्य दलाच्या आहाराबद्दलच्या प्रश्नाला सोशल मीडियातून वाचा फोडणा-या तेज बहाद्दूर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जवानांना मिळणा-या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल एकच संतापाची लाट उसळली होती.

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. तेज बहाद्दूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर तेज बहाद्दूर यांनी आणखी एक व्हिडीओ करुन छळ सुरु असल्याचा आरोपही केला होता.

मात्र, ‘बीएसएफ’ने तेज बहाद्दूर यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. खोटी तक्रार करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप तेज बहाद्दूर सिंह यांच्यावर होता. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये ज्या जवानांची चौकशी केली, त्यापैकी कोणीही निकृष्ट जेवण दिले जात असल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळे तेज बहाद्दूर यांचा तो आरोप खोटा असल्याचे सांगून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

COMMENTS