गावकऱ्यांसोबत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी केले श्रमदान।

गावकऱ्यांसोबत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी केले श्रमदान।

परळी – भविष्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईसारख्या भीषण परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर येणार नाही याची दक्षता आणि काळाची गरज ओळखून नागरिकांनी एकजुटीने वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात सहभागी व्हावे असे आवाहन खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी केले. परळी तालुक्यातील लिंबोटा व अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना आवर्जून भेटी देऊन खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान केले. भतानावाडी येथील जलदूतांशी संवाद साधत असताना खा.मुंडे बोलत होत्या.

पुढे बोलताना खा.प्रितम मुंडे म्हणाल्या दुष्काळासारखी भीषण परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार ही संकल्पना मांडली या संकल्पनेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. आपला परिसर दुष्काळमुक्त आणि पाणीदार करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जल संधारणाची विविध कामे राबविली जात आहेत. पाणी फाउंडेशनच्या या प्रयत्नांना सुद्धा लोकचळवळीचे स्वरूप मिळाले आहे . वॉटर कप स्पर्धा लोकसहभागातुन लोककल्याणाचा वेध घेणारी असून आपल्या उज्वल आणि पाणीदार भविष्यासाठी प्रत्येक गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या भागाची पाणी पातळी वाढवण्यासाठी व परिसरातील पाणी आपल्याच परिसरात अडवून ठेवण्यासाठी एकजुटीने जल संधारणाची कामे करावीत असे खा.डॉ.प्रितम मुंडे म्हणाल्या.

एकजूट आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद

दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण दाहकता सर्व समाज घटकांपासून शेतकऱ्यांच्या पशुधनापर्यंत सर्वांना जाणवत आहे. भविष्याचा वेध घेऊन दुष्काळमुक्त पाणीदार परिसर करण्यासाठी सर्व समाज घटक एकत्र येऊन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दाखवलेली एकजूट नवा आदर्श निर्माण करणारी आहे.
तसेच ज्या कार्यात महिलांचा सहभाग असतो ते कार्य काटेकोरपणे यशस्वीरित्या पूर्ण होते. सर्वांची एकजूट आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी म्हंटले.

COMMENTS